Wednesday, March 16, 2011

मराठीचा आग्रह

गेली कित्येक वर्षे आपला समाज मराठीच्या जतनासाठी आणि प्रसारासाठी आग्रही आहे. गोवा आणि सिंधुदुर्गात आपल्या समाजाने मराठीचा आग्रह धरला. त्याचबरोबर आपण कोंकणी आणि मालवणीचा सन्मानही करतो. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे धोरण हे मराठीला प्राधान्य देण्याचे होते. कोकणी मराठी वाद हा तसा जुना आहे पण वादात न पडता आपला समाज दोन्ही भाषांना समान स्थान देताना दिसतोय.

मराठीच्या गोव्यातील उन्नतीला लाभलेला आपला पाठींबा हा असाच चालु राहीला पाहिजे. दोन्ही भाषांना समान स्थान दिले गेले पाहिजे पण मराठीचा पुर्ण विरोध करणाऱ्यांना आपणही शाब्दीक विरोध करण गरजेच आहे. दोन्ही भाषेचा आदर करताना मराठीच नुकसान होउ देता कमा नये.

मराठी ही आपल्या सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये विधिमध्ये वापरली जाते. मराठी गाणी मराठी चित्रपट या सर्व मराठी क्षेत्रांत आपल्या समाजाचे योगदान मोठे आहे. मराठी भाषेच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात सध्या जोरदार हालचाली होत आहेत. आपल्या नकळत मराठीची जागा इंग्रजीने घेतली आहे. ह्या लढ्यात महाराष्ट्रातील सर्व मराठी लोकांना पाठींबा देणे गरजेचे आहे. आपल्या समाजाचे जे लोक गोव्यातुन सिंधुदुर्ग, मुंबई, नाशिक, पुणे, रत्नागीरी या ठीकाणी स्थायिक झाले त्यांनी मराठी पुर्ण आत्मसात केली. मराठीच्या प्रसारात योगदान दिले. हे कार्य असेच चालू राहण गरजेच आहे.

कोकणी आणि मालवणीबरोबरच मराठीसाठी आग्रही राहण भाषेच जतन करण ही काळाची गरज आहे तरच आपली पवित्र भाषा जिवीत राहील.
धन्यवाद

4 comments:

Gomantak Maratha said...

धन्यवाद बकुळ पैंगणकरजी. हो आपण म्हणताय ते अगदी बरोबर आहे. शिक्षणामुळेच आज हे दिवस दिसत आहेत. रायसाहेब डॉ. आर् डी खानोलकर, राम परुळेकर,बांदोडकर, काकोडकर यांच्या शिक्षणसंस्था ह्या केवळ एका समाजासाठीच नव्हे तर सर्वच समाजाच्या कामी आल्या.

bakulpaigankar said...

hari oam , i don't know how you all write in marathi ?

i would like to say education is must for our community . we can bench mark ourselves with only and only Bengali's not even chitpavans . i had been living in mumbai till may-08 . parle(E). our all surroundings was chitpavans all brilliant people accept it. our community has produced roll models more than chitpavans.
there was migration from goa,education and visionary ladies ( this we should not forget).
then opportunities and exposures of mumbai , america.
so , let's come together .
contact 9767879553/9021373628

bakulpaigankar said...

हरी ॐ,

बकुल पैगनकर
976787955३/
9021373628

Gomantak Maratha said...

Dhanywad Paigankarji
Mala wel miltach mi call karen.