Wednesday, March 30, 2011

एक नवी सुरुवात

गेले अनेक दिवस मी या ब्लॉगच नाव काय असाव यावर विचार करत होतो . हा ब्लॉग म्हणजे कोकणातील आपल्या समाजातील लोकांना एकत्र आणण्याचा एक प्रयत्न आहे. म्हणूनच याच नामांतरण कोकणस्थ मराठा समाज महासंघ ब्लॉग असे केले आहे.  गोव्यात आणि मुंबईत गोमंतक मराठा आपल्या गोव्यातील समाजासाठी काम करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि मुंबईतील आपल्या समाजासाठी नाईक मराठा मंडळ, नूतन मराठा मंडळ आणि अखिल सिधुदुर्ग जिल्हा देवळी उन्नती मंडळ काम करत आहेत. कारवारालाही एक कारवार नाईक समाज उन्नती मंडळ आहे. पण तरीही आपल्या समाजात एकीची कमी आहे. आज सगळे समाज एक होत आहेत . एकीतून समाज उन्नती साधता येते. अनुभवांची देवाणघेवाण करता येते. या ब्लॉगचा हेतू हा आहे की आपल्या समाजाच्या सर्व लोकांनी एकत्र येऊन समाजासाठी कार्य कराव. ही इंटरनेटवरील कल्पना जर सत्यात उतरवायची असेल तर सर्वांनी एकत्र होण गरजेच आहे.

मी पुढाकार घेतलाय पण मोठ्या लोकांनी पुढे यायची गरज आहे. आपल्याला केवळ भविष्याचा विचार करायचा आहे. त्यासाठी एक मोठा समाज निर्माण करणे गरजेच आहे. आपल्याला अभिमान असला पाहिजे आपण केलेल्या प्रगतीचा. आपल्याला अभिमान असला पाहिजे आपण घेतलेल्या उच्च शिक्षणाचा. आपल्याला अभिमान असला पाहिजे आपण कमावलेल्या वैचारिक श्रीमंतीचा. जी स्वप्नवत प्रगती आपल्या समाजाने गेल्या ६० वर्षात केली आहे ती प्रगती अनेक समाजांना गेल्या ५०० वर्षात जमली नाही आहे याचाही आपल्याला अभिमान हवा. गेले अनेक दिवसांच्या विचारमंथना नंतर सदर ब्लॉगचे नाव आणि यु आर एल बदलत आहे तरी त्याची क्त्रपया नोंद घ्यावी.

 नवीन नाव - कोकणस्थ मराठा समाज महासंघ ब्लॉग

यु आर एल -  1)  http://konkansthamaratha.blogspot.com/
                     2)  http://www.kmsm.co.cc/

No comments: