Tuesday, March 29, 2011

याला म्हणतात देश आणि समाज

हिंदुस्थानी समाजाने शिकाव्यात 10 जपानी गोष्टी ---

महाभयंकर भूकंप आणि सुनामीच्या जबरदस्त तडाख्यात जपान उद्ध्वस्त झाला. निसर्गाच्या प्रकोपाचे हे भीषण रूप पाहून अवघ्या जगाचा थरकाप उडाला. मनं हेलावून गेली, पण या महासंहारक संकटाच्या काळातही जपानी माणसाने जगाला सद्गुणांची ओळख करून दिली. केवळ हिंदुस्थाननेच नव्हे तर प्रत्येक राष्ट्राने जपानकडून शिकाव्यात अशा 10 गोष्टी या काळात समोर आल्या...

प्रेम : रेस्टॉरंटस्नी आपले खाद्यपदार्थांचे दर कमी केले. जे बलवान आहेत त्यांनी दुर्बलांची काळजी घेतली. एटीएम यंत्रावरील सुरक्षा व्यवस्थाही हटविण्यात आली होती. पण एकही एटीएम लुटले गेले नाही.

संयम : दुभंगलेली जमीन आणि लाटांच्या तांडवात जपानी माणूस आपलं सर्वस्व गमावून बसला, पण दु:खातिरेकाने छाती बडवून घेणार्‍या एकाही जपानी माणसाचे छायाचित्र जगापुढे आले नाही.

प्रतिष्ठा : संकटाच्या काळातही एकमेकांची प्रतिष्ठा जपानी माणसाने जपली. पाण्यासाठी किंवा अन्नधान्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या खर्‍या, पण या रांगेतून कधी कुणी कुणावर डाफरलं नाही, शिवीगाळ तर दूरच, साधा रागाचा कटाक्षही कुणी टाकला नाही.

भान : प्रत्येकालाच काही ना काही मिळायला हवे याचे भान इथल्या लोकांना आहे. म्हणूनच कोणीही गरजेपेक्षा जास्त वस्तू खरेदी करून साठेबाजी केली नाही. जेवढी गरज तेवढीच खरेदी हे त्यांचे धोरण होते.

सुव्यवस्था : एरवी अशा महासंकटाच्या काळात चोरीमारीला ऊत येतो. पण जपानमध्ये एकही दुकान लुटले नाही. वाटमारी झाली नाही. वाहतूकही नियमाला धरून सुरू होती. कुठेही ओव्हरटेकिंगची घाई नव्हती. होता तो समजूतदारपणा.

त्याग : पन्नास कामगारांनी जीवाची पर्वा न करता अणुभट्ट्या शांत करण्यासाठी समुद्राचे पाणी उपसण्याचे काम केले. त्यांच्या शौर्याचे आणि त्यागाचे मोल कसे करणार?

जाणीव : एका दुकानात वीज गायब झाली तेव्हा आतील ग्राहकांनी खरेदीसाठी हातात घेतलेल्या वस्तू पुन्हा दुकानातील रॅकवर परत ठेवल्या आणि ते शांतपणे दुकानाबाहेर येऊन थांबले.

प्रशिक्षण : या संकटाच्या काळात कसा मुकाबला करायचा? काय काळजी घ्यायची हे थोरांनी लहानांना शिकविले. जाणत्यांनी अजाणत्यांना समजावले. प्रत्येकाने दुसर्‍याची काळजी घेतली.

(कॉपी-पेस्ट इंटरनेटवरुन)

No comments: