Tuesday, April 19, 2011

आवाहन

मित्रांनो या ब्लॉगमध्ये आपल्या सहभागाची गरज आहे. या ब्लॉगबरोबरच आपला फेसबुकवर ग्रुप आहे. सर्वप्रथम आपले ऐक्य साधणे गरजेच आहे. आपली सदस्यसंख्या वर्षअखेरीस निदान ५०० पर्यत नेण हे आपल टार्गेट असाव. त्याचबरोबर आपले गुरुतुल्य वरिष्ठ सदस्य ज्यांनी नूतन मराठा, नाईक मराठा आणि गोमंतक मराठा सारख्या संघटना बांधल्या आणि ज्यांच्यामुळे आज आपल्याला हे दिवस दिसत आहेत त्यांना या ब्लॉगमध्ये समाविष्ट करून घेण गरजेच आहे. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आपण प्रगती नाही करू शकत. सध्या आपल्याला गोव्यातून किशोरजी पैगणकर यांच मार्गदर्शन मिळतंय त्यांचे आम्ही आभारी राहू. जास्तीत जास्त वरिष्ठ सदस्यांच मार्गदर्शन मिळाव यासाठी आम्ही प्रयत्न करतोय.

हा ब्लॉग चौदा ते शंभर (त्याहीपेक्षा अधिक वय असेल तरी चालेल :) )  अशा सर्व वयोगटातील लोकांसाठी खुला आहे. आपण जर या कोकणस्थ मराठा  समाज महासंघ ग्रुपशी वा ब्लॉगशी जोडले गेला असाल तर आपल्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना या ब्लॉगविषयी सांगण्यास विसरू नका. त्यांचा सहभागही महत्वाचा आहे. गेल्या काही वर्षात आपण केलेली स्वप्नवत प्रगती हा अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. जर त्या काळात आपल्या समाजाच्या उच्चशिक्षित लोकांनी समाजाकडे पाठ फिरविली असती तर आज आपण एवढी प्रगती करू शकलो नसतो. 
 
अनारम्भो हि कार्याणां प्रथमं बुद्धिलक्षणम् 
प्रारब्धस्यान्तगमनं द्वितीयं बुद्धिलक्षणम् 
(आळशी माणसाच्या बुद्धीचे दोन प्रकार असतात, कामाची सुरुवात करयाचीच नाही आणि आपल्या नशिबावर विसंबून रहायचं. आपल्याला हे अभिप्रेत नाही.)

आज आपली जबाबदारी आहे समाजाला संघटीत करायची आणि आपल्या गौरवशाली वाटचालीची माहिती नवीन पिढीला देण्याची. गोमंतक मराठा समाज, (मुंबई, पणजी आणि कारवार) , नूतन मराठा समाज (मुंबई) आणि नाईक मराठा मंडळ (मुंबई,सावंतवाडी,शिरोडा,आरवली) या तीन संघटना आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत आहेत. या संघटना मजबूत करण हेही आपल कर्तव्य आहे. जेणेकरून याचा फायदा आपल्या पुढच्या पिढीला होईल. निदान एका तरी समाज संघटनेचा सदस्य बनण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. गोमंतक मराठा समाज आणि नाईक मराठा मंडळ यांची विवाह मंडळ मजबूत करण हेही आपले प्रमुख ध्येय असलं पाहिजे. महासंघ ही पुढची पायरी आहे. आपल्याला जातीयवाद करायचा नाही आहे की कुठली ब्रिगेड उभी करायची नाही. आपल्याला केवळ एकमेकांना साह्य करून आपली आणि पर्यायाने आपल्या समाजाची, देशाची प्रगती साधायची आहे. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ

संभोजनं संकथनं संप्रीतिश्च परस्परम् ।
ज्ञातिभिः सह कार्याणि न विरोधः कदाचन ॥ 

Our Samaj Related  Links on Internet : -
  1. Konkanstha Maratha Samaj Mahasangh Group on Facebook 
  2. Konkanstha Maratha Samaj Mahasangh Page on Facebook
  3. Gomantak Maratha Samaj Community on Orkut by Tushar
  4. Gomantak Maratha Samaj Community on Orkut by Bakul
  5. Naik Maratha Mandal Official Website
  6. Gomantak Maratha Samaj Official Website 
  7. Ethnic and social groups of Goa and Konkan

    No comments: