Tuesday, April 19, 2011

खारीचा वाटा

गेले काही दिवस मला या ब्लॉगसाईटवर लिहायचे होते. पण वेळ मिळत नव्हता. आज वेळ मिळालाय. प्रथम तुम्हा सर्वाचे धन्यवाद. तुम्ही गेल्या एका महिन्यात जो प्रतिसाद दिलात त्याने आम्ही थक्क झालोत. प्रथम ज्यावेळी ब्लॉगसाईट आणि फेसबुकचा ग्रुप वामनने सुरू केला त्यावेळी पहिले दोन दिवस प्रतिसाद मिळाला नव्हता. पण नंतर बकुळ पैगणकर यांचा वामनला फोन आला. त्यांनी ही कल्पना उचलून धरली. नंतर रोहन साखळकर, अभिषेक कोलवाळकर , अंकिता कुंडईकर, शोभा अस्नोत्कर, भावेश जम्बुलीकर, सोनमं पेडणेकर , अनिकेत वजराठकर, सुमेधा देविदास , विक्रांत आजगावकर आणि इतरांचा (७४ नाव आहेत सर्वाची नावे लिहिणे शक्य नाही. कृपया राग मानू नये) सपोर्ट मिळत गेला.

गोमंतक मराठा समाजचे वरिष्ठ सदस्य किशोर पैगणकर यांचेही बहुमुल्य मार्गदर्शन सध्या मिळत आहे. मला खूप चांगल वाटतय की मी या ब्लॉगसाईटची  लेखिका आहे. वामनच्या आणि त्याच्या सहकाऱ्याच्या या कामात माझा खारीचा वाटा. मी या समाजात आले त्यावेळी मला जो आपलेपणा मिळाला त्याने मी कायमची या समाजाची झाले. वामनवरही रायसाहेब डॉ. खानोलकर आणि सावित्री खानोलकर यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांच्या शाळेतच तो शिकला. त्यामुळे समाजाची परतफेड हाही एक उद्देश आहे. या ब्लॉग आणि ग्रुप बरोबरच गोमंतक मराठा समाज आणि नाईक मराठा मंडळ तसेच विवाह मंडळ ही संस्था मजबूत करण हेही आपल् ध्येय असल पाहिजे. या एकंदरीत ब्लॉग आणि ग्रुपच्या कामात बकुळ पैगणकर यांची जी भूमिका आहे ती खूप महत्वाची आहे. या कामात त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. बकुळजी नाशिकवरून सतत मार्गदर्शन करत असतात. या सर्वांनी ह्या कामात स्वत:ला झोकून दिलंय. 

मागच्या पिढीने केलेल्या कार्यामुळे आपली आजची पिढी सुखात जगतेय. आपल्या पुढच्या पिढीसाठी कार्य करण्याची जबाबदारी आपली आहे. माझ सगळ्यांना एवढच आवाहन आहे की आपण पुढे याव. संघठीत व्हाव आणि प्रगती करावी.

No comments: