Monday, April 25, 2011

स्वागत

मी कोकणस्थ मराठा समाज महासंघ या ब्लॉगसाईट आणि फेसबुक ग्रुपच्यावतीने गोमंतक मराठा समाजाचे वरिष्ठ कार्यकर्ते श्री. किशोर पैंगणकर यांचे या ब्लॉगसाईटवर स्वागत करतो. गेले अनेक दिवस आम्ही त्यांचे मार्गदर्शन घेत होतो. ते आपल्या फेसबुकवरील ग्रुपचे सदस्य आहेतच पण आजपासून किशोरजी आपल्या ब्लॉगसाईटचे योगदानकर्ते झाले आहेत. नवीन सदस्यांसाठी  त्यांचा हा अल्पपरिचय. गेली काही वर्षे श्री. किशोर पैंगणकर हे आपल्या मूळगावी पैगनी (काणकोण तालुका, गोवा ) येथे वास्तव्यास आहेत. तत्पूर्वी त्यांनी मुंबईत असताना गोमंतक मराठा समाज मुंबई या संस्थेचा कार्यकर्ता म्हणून अनेक वर्षे काम केले. किशोरजी गोमंतक मराठा समाजाचे सच्चे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या जवळ समाजाच्या स्थापनेपासून आजमितीस झालेल्या प्रगतीबद्दल प्रचंड माहितीचा खजिना आहे. आपल्या तरूण पिढीला किशोरजींच्या मार्गदर्शनाचा जरूर फायदा होईल. गेले काही दिवस मी आणि बकुळजी सतत किशोरजींच्या संपर्कात आहोत. त्यांनी ज्या उत्साहाने आम्हाला मार्गदर्शन केल त्यातून आम्हालाही प्रेरणा मिळाली आणि इतरांनाही मिळेल ही मी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा किशोरजींचे ब्लॉगसाईटवर हार्दिक स्वागत. 

तसेच गेल्या दोन दिवसात फेसबुक वर जॉईन झालेल्या राखी नाईक, राधा मंगेशकर, रोहन मठकर, प्रजोत पैगणकर, विराज मठकर आणि महेश शिंदे या सर्वाचे मी हार्दिक स्वागत करतो.                     

No comments: