Sunday, May 1, 2011

शंभरी गाठली

धन्यवाद. शुक्रवारी ठीक ७ वाजता आपल्या कोकणस्थ मराठा समाज महासंघाने सदस्य संख्येची शंभरी गाठली. उत्कर्ष बांदेकर हे आपले शंभरावे सदस्य ठरले. तीन महिन्यापूर्वी सुरू झालेल्या या ग्रुप आणि ब्लॉगसाईटला तुम्ही सर्व वाचकांनी चांगला प्रतिसाद दिलात याबद्दल मी तुमचा आभारी राहीन. हा ग्रुप किंवा ही ब्लॉगसाईट केवळ माझ्या नावाने ओळखली गेली तर त्याला मी माझ्या कार्यात मिळालेलं अपयश मानेन. हा महासंघ आपल्या सगळ्यांचा आहे. आपल्या समाजातील प्रत्येकाला हा ग्रुप आपला वाटला पाहिजे हाच माझा आणि इतर लेखकांचा प्रयत्न राहील आणि त्यासाठी आपल्या सहभागाची गरज आहे. या ब्लॉगसाईटवर आपल्या समाजातील प्रत्येक आडनावाची माहिती, यशस्वी आणि उदयोन्मुख व्यक्तिमत्वांची माहिती, कुलदेवतेची माहिती देण हे आमच उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे. तुम्ही जर मराठी, कोंकणी, इंग्रजी अशा कोणत्याही भाषेत आपल्या परिवाराबद्दल लिहू शकत असाल तर आमच्याशी सम्पर्क साधा. आम्ही तुम्हाला या साईटचे लेखक करून घेवू. मला

           

No comments: