Wednesday, May 11, 2011

वर्धापनदिन

गोमंतक मराठा समाज गोव्याचा ८६ वा वर्धापनदिन सोहळा मोठया उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यास उपस्थित रहाण्याचं भाग्य मला आणि विस्मयीला लाभल. २०१०-२०११ हे वर्ष गोमंतक मराठा समाजाने भाऊसाहेब बांदोडकरांच जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजर केल. गेल्या वर्षभरात गोमंतक मराठा समाज गोव्याने अनेक स्तुत्य उपक्रम राबवले. समारोपाच्या सोहळ्यास मला उपस्थित रहाण्याचं भाग्य अर्थात किशोर काकांमुळेच मिळाल. दोन आठवडयापुर्वी मला किशोर काकांचा फोन आला त्यावेळी त्यांनी मला या कार्यक्रमाविषयी माहिती दिली होती. त्याचवेळी मी जाण्याच ठरवलं. मी आणि विस्मयी शनिवारी घरी म्हणजे वेंगुर्ल्यात आलो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी ९ च्या वेंगुर्ला-पणजी बसने आम्ही आमचा प्रवास सुरू केला. बस शिरोडा-मळेवाड -पेडणे -म्हापसा मार्गे पणजी जाणार होती त्यामुळे उशीर होणार हे आम्ही गृहीत धरल होत. जर कारने प्रवास केला तर वेंगुर्ला ते पणजी अंदाजे ५५ मिनिटाचे अंतर त्यालाच बसने दोन तास लागतात. ११ वाजता आम्ही पणजीत पोहचलो. लोकल बसने फेरीबोटला गेलो. तेथे उतरताच समोर किशोर काका मिळाले. दिसताक्षणीच आम्ही काकांना ओळखल. साधी राहणी पण उच्च विचारसरणी याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे किशोर काका. वेळेचा अजिबात अपव्यय न करता काका आम्हाला कार्यक्रम स्थळी घेऊन निघाले. त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असाच होता. मला विस्मयी म्हणाली चालण्याच्या बाबतीत काकांशी स्पर्धा करण हे काही येरागबाळ्याचे काम नाही. दुरुनच आम्हाला तीन मजली टोलेगंज  इमारत दिसली. "दयानंद स्मृती" ही वास्तू गेल्या अनेक वर्षात घडलेल्या क्रांतीची मूकदर्शक आहे. आम्ही लिफ्टने वर गेलो. राजाराम स्मृती सभागृहात वर्धापनदिन सोहळा सुरू होता. ह्या नामकरण करण्यात आलेल्या सभागृहाच उद्घाटन १९९१ साली ख्यातनाम शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी केल. मान्यवरांची भाषणे चालू होती. भाषणे कोकणीमध्ये होती. आम्हा दोघानाही कोकणी चांगलीच कळते आणि आमची बोलीभाषा मालवणी ही कोकणीचीच बोलीभाषा असल्यामुळे भाषण कळण्यात काही त्रास झाला नाही.  

समारोहात श्री कामत, गोमंतक मराठा समाज गोव्याचे अध्यक्ष श्री सुभाष साळकर , उमेश नाईक व अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केल. सर्वप्रथम काकांनी माझी भेट प्राईमस्लॉट कंपनीचे एम डी श्री प्रदीप पाल्येकर यांच्याशी घडवून आणली. ते सध्या गोमंतक मराठा समाज गोव्याचे कार्यकारी समिती सभासद आहेत. त्यांना मी आपल्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. त्यांनी मदतीचे आश्वासन दिले. तदनंतर माझी भेट श्री विनायक शिंदे यांच्याशी झाली. ते सध्या नाईक मराठा मंडळाचे कार्यकारी समिती सभासद आहेत. तसेच ते गोमंतक मराठा समाज मुंबईसाठी काम पहातात. त्यांच्याशी आम्ही विवाह मंडळाच्या बाबतीत सविस्तर चर्चा केली. विनोद जाम्बुलीकर, जोतकर, अमेय म्हार्दोलकर, रमेश माजलीकर  आणि सुनील पैगणकर यांचीही आम्ही भेट घेतली. सर्वात महत्वाची भेट ठरली ती म्हणजे गोमंतक मराठा समाज गोव्याचे अध्यक्ष श्री सुभाष साळकर यांची, त्यांना मी आपल्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. आपल्या समाजासाठी काम करणाऱ्या विविध संघटना कशा मजबूत करता येतील आणि कसा माहितीचा प्रसार करता येईल हे आम्ही त्यांना सांगितले. त्यांनीही आम्हाला संपूर्ण मदतीच आश्वासन दिल. 

आमच्या दौऱ्याला मिळालेलं यश हे केवळ किशोर पैंगणकर काकांमुळे शक्य झाल आणि बकुळ पैंगणकर यांना मी कसा विसरेन? त्यांनीच पुढाकार घेऊन माझी आणि किशोर काकांची फोनवर भेट घडवून आणली. भेटीगाठी संपल्यावर आम्ही जेवणाकडे मोर्चा वळवला. सकाळपासून काहीच न खाल्यामुळे जोरदार भूक लागली होती. जेवण अप्रतीम होत आणि गोवेकरांचा पाहुणचारही अप्रतीम. साखरभात अगदी आमच्या घरात करतात तसाच तीच चव. डाळ -भात हे माझ आवडत जेवण आणि फाजावाची उसळ जी आमच्या सिंधुदुर्गात देखील लोकप्रिय आहे. पोटभर जेवल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. पैंगणकर कुटुंबाचा निरोप घेतला. संध्याकाळी ५ची शेवटची वेंगुर्ला बस पकडून आम्ही घरी रवाना झालो. भाऊसाहेब बांदोडकरांच्या कार्याने पावन झालेल्या या भूमीत लवकरच पुन्हा येऊन राहिलेली काम पूर्ण करण्याच्या निर्धाराने आम्ही पणजी शहरातून रवाना झालो. 

धन्यवाद.                     
आपलाच ,
वामन राधाकृष्ण परुळेकर.

2 comments:

vdamle said...

very good account. I would have liked to write in Marathi but do not know how! Bakul Painginkar is responsible in bringing us together too. I will surely write for you. can you recommend me some books on Naik samaj or others. I have read quite abit on Gomantak samaj but had no idea about a samaj in Konkan. you are doing a good job of networking.

Waman Parulekar said...

hi mam, naik maratha mandal is working for our samaj in Sindhudurg and Mumbai. They hv ther own site. i.e. http://nmm.co.in
I am not member of Naik Maratha Mandal. I am member of GMS Goa. I am sending few options of how to write in marathi
1) http://www.google.com/transliterate/Marathi

2) http://www.quillpad.in/marathi/

3) http://www.google.com/ime/transliteration/

thanks