Monday, June 6, 2011

आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर

हिराबाई पेडणेकर (१८८५ - १९५१)

हिराबाई पेडणेकर यांच नाव आज विस्मृतीत गेल आहे. गेल्या अनेक लेखात आपण विस्मृतीत गेलेल्या अनेक महान व्यक्तिमत्वांची ओळख करून घेतली. आज आपण हिराबाई पेडणेकर यांच्या कार्याची ओळख करून घेणार आहोत. आद्य मराठी महिला नाटककार हिराबाई पेडणेकर यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील सावंतवाडी येथे झाला. हिराबाई यांना साहित्याची फार आवड होती. हिराबाई यांनी आपलं सातवीपर्यंतच शिक्षण पूर्ण झाल्यावर साहित्याचे धडे घेण्यासाठी खाजगी शिकवणी लावली.  साहित्य आणि मराठी भाषेची आवड असल्यामुळे अल्पावधीतच त्यांनी मराठी भाषेत प्रभुत्व प्राप्त केले. मराठी साहित्याचा इतिहास त्यांनी जाणून घेतला. मराठी वगळता बंगाली, हिंदी आणि इंग्लिश या भाषांचाही अभ्यास हिराबाई यांनी केला. 

हिराबाई या चांगल्या गायिका होत्या. त्यांना गायनकला आणि नृत्यकला अवगत होती. हिराबाई यांच्या प्रतिभेमुळे तत्कालीन अनेक आघाडीच्या नाटककारांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली. हिराबाई या कविता लिहीत. त्यांच्या कविता तेव्हाच्या आघाडीच्या मराठी साप्ताहिकात प्रसिद्ध झाल्या. मनोरंजन आणि उद्यान या दोन प्रसिद्ध साप्ताहिकात  हिराबाईंच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. दरम्यान त्यांची "माझे आत्मचरित्र" ही लघुकथा प्रसिद्ध झाली आणि त्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचल्या. 

त्यांच पाहिलं नाटक "जयद्रथ विडंबन" हे १९०४ मध्ये प्रकाशित झाल. हे एक संगीत नाटक होत. या नाटकातील पदे तत्कालीन टीकाकारांनी उचलून धरली. त्यांच दुसर नाटक "दामिनी" हे १९१२ मध्ये प्रसिद्ध झाल. हे नाटक केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श या कंपनीने रंगमंचावर आणल. अशाप्रकारे हिराबाई या पहिल्या महिला नाटककार बनल्या. सुनिता देशपांडे यांच्या लेखानानुसार तत्कालीन संगीत नाटकसृष्टीवर हिराबाई यांचा मोठा प्रभाव होता. त्या पुढे लिहीतात की कोल्हटकर आणि गडकरी यांनी वेळोवेळी नाटक संगीतबद्ध करताना हिराबाई यांची मदत घेतली. हिराबाई यांचा एवढा प्रभाव वाढला होता की एका नाटककाराने त्यांच्या जीवनाला समोर ठेऊन नाटक लिहीले आणि नायिकेचे पात्र उभे केले.    

१९५१ मध्ये हिराबाई यांचा मृत्यू झाला आणि एका पर्वाचा अंत झाला. हिराबाई यांच्या संगीत नाटकातील योगदानाची दखल फारशी घेतली गेली नाही. सुनिता देशपांडे वगळता अन्य लेखकांना आणि स्त्री स्वातंत्र्याच्या बाता करणाऱ्या पंडीतांना हिराबाई पेडणेकर यांची दखल घ्यावीशी वाटली नाही याची खंत वाटते.  


Reference - Encyclopaedia By Sunita Deshpande


3 comments:

vasanti said...

Hirabai Pednekar was a first woman play writer is known to women activist and a whole book is available on her but of course not written by her.It was a tragedy that she could not pursue her interests further due to the social system of that era.She had to leave Mumbai and went to Kokan with a man who took great pride in saying that she lived like a 'pativrata' with him and had renounced her early yearnings.thus Marathi stage and Marathi literature lost a promising literature to a house bound 'adarsh' woman. we do not know how many women must have nipped their interests at the budding stage itself to conform to the set standards of society.

Anonymous said...

I recollect reading a book written in marathi . I think the title was " Hirabai ani Kolhatkar" some time in 1970. The book refered to the relationship of Hirabai and Bhaurao Kolhatkar. It also gave the details of afteryears of Hirabai.If my memory is correct,it was mentioned in that book that in later years, she was neglected by the Drama artists and she stayed with one Mr. Nene working for railways. For some time they stayed at Vile parle and later she went( alone) to his native village 'Plashet' near Ghuhagar. Like many other persons from konkan, Mr. Nene worked in Mumbaiand used to go to his native place only during Holidays. and his house and wadi at palshet was managed by Hirabai as any other Konkani wife.

Waman Parulekar said...

Thanks for your comment sir/madam.