Tuesday, October 25, 2011

दिवाळी शुभेच्छा
8 महिन्यांपूर्वी फेसबुकवर एकीकरणाची सुरू केलेली ही मोहीम आज यशस्वी होत आहे हे पहाताना मला अतिशय आनंद होत आहे. आपल्या सिंधुदुर्ग, गोवा आणि कारवार भागातील विखुरल्या गेलेल्या समाजाला फेसबुकवर एकत्र आणणे आणि समाजसुधारकांच्या कार्याची माहिती करून देणे हा आमचा पहिला उद्देश होता आणि त्यात आम्ही बऱ्यापैकी सफल झालो आहोत. १५० वर्षांपुर्वी किल्लेदार बाळोजीराव परुळेकर आणि रायसाहेब डॉ. खानोलकर तर १०० वर्षांपुर्वी राजाराम पैगीनकर यांनी सूरु केलेल्या एकत्रीकरणाच्या मोहिमेला मध्यंतरी विश्रांती मिळाली होती. ही मोहीम पुन्हा एकदा नव्या स्वरुपात सुरू करण आणि समाजाच्या विकासाला चालना देण हे मुख्य उद्देश होते आणि आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रायसाहेब डॉ. आर्. डी. खानोलकर, रावसाहेब शंकर मठकर आणि सुभेदार मेजर विष्णुपंत परुळेकर या त्रयींनी आपल्या कार्यकर्तृव्ताने समाजाला सन्मानाची जागा प्राप्त करून दिली. गोव्यात हेच काम राजाराम पैगीनीकर, दयानंद बांदोडकर आणि अनेक इतर दिग्गजांनी केले. या महान लोकांच्या कार्याची जाणीव तरूण पिढीला करून देणे अतिशय महत्वाचे आहे. त्याला एकच कारण आहे ते म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत बंड पुकारून स्वत:च्या समाजाला चांगली स्थिती प्राप्त करून देण्यासाठी तत्कालीन विचारवंतांनी आणि सामाजासुधारकांनी जर प्रयत्न केले नसते तर कदाचीत आपण आजही अविकसीत राहिलो असतो. समाजाकडे मागे वळून पाहण्याची वृत्ती जर या दिग्गजांकडे नसती तर विचार करा आपण एवढी प्रगती केली असती का?
कोणतीही व्यक्तीपूजा न करता या महान लोकांचे विचार आचरणात आणत आपल्याला अजून प्रगती करायची आहे. त्यामुळेच सुरू केली ही मोहीम. अर्थात सुरुवातीला मी, माझी पत्नी विस्मयी आणि वडील असे तीनच सदस्य होते. ०७ फेब्रुवारी या दिवशी मी Abhishek Kolwalkar यांना add केले. माझ्या कुंटूंबाव्यतिरिक्त ते आपले पहिले सदस्य ठरले. त्यानंतर Samir Raikarji , Arun Bordekarji, Rohan Sakhalkar, Shashank Naik, Borkar Nitinkumarji यांना add केलं. दिवसेंदिवस आपलं कुटुंब वाढतच गेल. ०४ एप्रिलला आपल्याला Bakul Paigankar यांच्यासारखे active member मिळाले. आपल्या या मोहिमेत आपल्याला सदस्य वाढविण्यात मोठी मदत मिळाली ती Ankita Kundaikar, Bakul Paingankar आणि samir raikar यांची. त्यानंतर केवळ झंझावात. प्रत्येक कार्यात काहीना काही विघ्ने असतातच तसा आम्हालाही काही लोकांनी विरोध केला पण तो न जुमानता आपण प्रगती करत गेलो आणि अजूनही करू. अजून काही वर्षांनी आपला रजिस्टर महासंघ होईल यात शंकाच नाही. यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे त्यासाठी कोणीही पुढाकार घेतला तरी त्याचे स्वागतच असेल.

गेल्या काही दिवसात आपण केलेल्या प्रगतीचा हा अल्प आढावा.  तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

धन्यवाद.

No comments: