Sunday, October 2, 2011

नव्या युगाची मुहूर्तमेढ

प्रत्येक दिवसाच अस स्वतःच एक महत्त्व असत. आजचा दिवस महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री जयंतीचा पण त्याचबरोबर आजचा दिवस गोव्याच्या इतिहासातील सामाजिक क्रांतीचा दिवस. शेकडो वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी एका विलक्षण व्यक्तिमत्वाने बंड पुकारल, प्रस्थापितांना आव्हान दिल आणि नव्या युगाची मुहूर्तमेढ रोवली. आजच्याच दिवशी २ ऑक्टोबर १९१० ला राजाराम पैगिनीकर यांनी पैगीनी या गावी समाजसुधारणेची चळवळ सुरू केली होती. सामर्थ्य आहे चळवळीचे | जो जो करील तयाचे || हा विचार त्यांनी समाजाला दिला. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालून आज जी प्रगती साध्य झाली आहे ते पाहून त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटते पण त्याचवेळी खंत वाटते की आपल्याला या महापुरुषाचे विस्मरण झाले आहे. माझे राजाराम पैगीनीकर यांना नम्र अभिवादन.  

No comments: